तोक्यो मराठी मंडळ आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक यांच्या संयुक्त प्रयत्नांतून साकार झालेला हा "माझे ग्रंथालय" उपक्रम! जपानमध्येही "मराठी" वाचक आणि वाचन संस्कृती वाढीला लागावी या एकमात्र हेतूनी चालू केलेल्या या उपक्रमाला आपल्या सर्वांचा उदंड प्रतिसाद मिळेल याची आम्हाला आशाच नव्हे तर मनापासून खात्री आहे!
आत्ताच्या घडीला आपल्याकडे लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी मिळून ५०० पुस्तकं आहेत. त्यात अनेकविध विषयांवरची, अनेक सुप्रसिद्ध लेखकांची, कथा-कादंबऱ्या-चरित्र-कवितासंग्रह-ललित-प्रवासवर्णन-नाटक-बालवाङ्मय-पंचतंत्र अशा चौफेर विषयांना वाहिलेली अत्यंत दर्जेदार पुस्तकं आहेत. शिवाय विविध प्रकाशक, पुस्तकांचे रसिक आणि व्यासंगी मित्रांच्या मदतीने यामध्ये उत्तरोत्तर भर घालण्याचाही आपला मानस आहे. त्यासाठीही आपल्या सर्वांचं सहकार्य मिळेल याची आम्ही आशा बाळगतो!
पुस्तकं वाचायला घ्यायची असल्यास खालील लिंकवरून WhatsApp ग्रुपला जॉईन करा.
आपल्या राहायच्या जागेच्या आसपास कोणाकडे पुस्तक पेट्या आहेत त्याबद्दल अधिक माहिती त्या ग्रुपवर मिळेल.
या ग्रुपचा उपयोग केवळ आणि केवळ पुस्तकं आणि ग्रंथालयासंबंधीत चर्चांसाठी'च' केला जाईल याची सारे जण मिळून काळजी घेऊयात !!
तोक्यो मराठी मंडळाच्या "माझे ग्रंथालय" ह्या उपक्रमाअंतर्गत महिन्यात एकदा अनौपचारिक वाचनकट्टा कार्यक्रम करणार आहोत. तुम्हाला आवडलेल्या पुस्तकाविषयी काही बोलायचे ,किंवा एखादा आवडलेला उतारा वाचून दाखवायचा, किंवा तुम्ही वाचलेल्या, आवडलेल्या पुस्तकांविषयी गप्पा मारायच्या असे कार्यक्रमाचे स्वरूप असेल.
आगामी वाचनकट्टा उपक्रमाबद्दल अधिक माहिती खालीलप्रमाणे:
दिनांक/वार :
जागा :
वेळ :
Add a footnote if this applies to your business