जपानमधील सर्व रसिक, साहित्यप्रेमी, कविता-गझलप्रेमी आणि मराठी भाषेवर, शब्दांवर, भावावर, स्वरांवर, सुरांवर प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाची बातमी घेऊन येत आहोत..
या वर्षीच्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तोक्यो मराठी मंडळ घेऊन येत आहे,
सुप्रसिद्ध कवी वैभव जोशी यांच्या कविता, गझल, रुबाईंनी सजलेला, आपल्या अभिनव संगीताने त्या शब्दांना साज चढवणाऱ्या डॉ आशिष मुजुमदार यांच्या संगीत दिग्दर्शनाने रंगलेला आणि दत्तप्रसाद रानडे यांच्या बहारदार, विविध्यपूर्ण गायनाने स्वरसाज चढलेला, नटलेला कार्यक्रम
"सोबतीचा करार"!!!
सिंथवर आणि सहाय्यक गायक आहेत निनाद सोलापूरकर, तबला-ढोलक साथीला आहेत आमोद कुलकर्णी आणि कार्यक्रमाची निर्मिती आहे साहित्यक्षेत्रातल्या अढळपदी पोचलेल्या 'रसिक साहित्य' यांची!
भारतात आणि भारताबाहेरही "मराठी भाषे"वर प्रेम करणाऱ्या सर्वांना एकत्र आणणारा, शब्द-सूर-संगीतात न्हाऊ घालून मंत्रमुग्ध करणारा हा घराघरात, मनामनात पोचलेला आपला लाडका कार्यक्रम तोक्यो मराठी मंडळ प्रथमच जपानमध्ये घेऊन येत आहे
दिनांक : १३ एप्रिल २०२५ (रविवार)
वेळ : दुपारी ४ ते संध्याकाळी ८
स्थळ: कासाई कुमिनकान, तोक्यो