तोक्यो मराठी मंडळ
  • मुख्य पान
  • 🌺✨ गणेशोत्सव २०२५ ✨🌺
  • मागील कार्यक्रम
    • गुढीपाडवा : सोबतीचा करार
    • कार्यक्रम २०२३
    • कार्यक्रम २०२२
    • कार्यक्रम २०२१
    • कार्यक्रम २०२०
    • कार्यक्रम २०१९
  • माझं ग्रंथालय
  • अभिव्यक्त
  • कार्यकारिणी समिती
  • नाव नोंदणी
  • More
    • मुख्य पान
    • 🌺✨ गणेशोत्सव २०२५ ✨🌺
    • मागील कार्यक्रम
      • गुढीपाडवा : सोबतीचा करार
      • कार्यक्रम २०२३
      • कार्यक्रम २०२२
      • कार्यक्रम २०२१
      • कार्यक्रम २०२०
      • कार्यक्रम २०१९
    • माझं ग्रंथालय
    • अभिव्यक्त
    • कार्यकारिणी समिती
    • नाव नोंदणी
तोक्यो मराठी मंडळ
  • मुख्य पान
  • 🌺✨ गणेशोत्सव २०२५ ✨🌺
  • मागील कार्यक्रम
    • गुढीपाडवा : सोबतीचा करार
    • कार्यक्रम २०२३
    • कार्यक्रम २०२२
    • कार्यक्रम २०२१
    • कार्यक्रम २०२०
    • कार्यक्रम २०१९
  • माझं ग्रंथालय
  • अभिव्यक्त
  • कार्यकारिणी समिती
  • नाव नोंदणी

गणेशोत्सव २०१९

कार्यक्रमाविषयी

 

तोक्यो मराठी मंडळाचा यंदाचा २४ वा गणेशोत्सव मोठ्या दिमाखात पार पडला. यंदाच्या वर्षी महाराष्ट्राचे लाडके आणि अजरामर व्यक्तिमत्व म्हणजेच पु.लं. देशपांडे ह्यांच्या १०० व्या जयंती निमित्त महाराष्ट्र नाही तर पूर्ण जगभर साजरा होत असलेला "पुलोत्सव" तोक्यो मराठी मंडळाने देखील आयोजित केला. त्याच बरोबर  ग.दि. माडगूळकर आणि सुधीर फडके ह्यांच्या देखील १०० व्या जयंती निमित्त येथील कलाकारांनी ह्या दिग्गज व्यक्तींच्या कलाकृती सादर करून त्यांना मानवंदना वाहिली. 

प्रथम, हिमांगी कुलकर्णी आणि मल्हार कुलकर्णी ह्यांनी गणेश पूजन केल्यानंतर तेजस्विनी घाणेकर ह्यांनी गणेशवंदना सादर करून कार्यक्रमाला सुरवात करत, नंतर भूषण सोनवणे (सतार), संकेत देशपांडे (हार्मोनिअम) आणि सचिन जैन (तबला) ह्यांनी निवडक पु.लं. ह्या कथाकथन मधील सुप्रसिद्ध धून वाजवून कार्यक्रमात अनोखी मजा आणली आणि पुलोत्सवाला सुरवात केली. त्यानंतर बालकलाकार (रजत कुलकर्णी, शिरीन देशपांडे, मार्वी धुमाळे, आर्यन कुलकर्णी, रोहन पोतदार, अर्जुन देवधर, सिद्धार्थ देशपांडे आणि रिया कुलकर्णी) ह्यांनी पु.ल. देशपांडे ह्यांचे सुप्रसिद्ध "वयं  मोठम खोट्म" चे नाट्यवाचन करून एकच हशा पिकवला. त्यानंतर सावनी नातू आणि लहान मुलींनी  शेपटी वाल्या प्राणी, चांदोबा चांदोबा भागलास का गाणी सादर करून छान माहोल निर्माण केला. त्यात जुईली देसाई ह्यांनी सुधीर फडके ह्यांचे आज कुणीतरी यावे हे गाणे सादर करून त्यात भर टाकली. त्याच पाठोपाठ मधुरा अध्यापक ह्यांचे एकाच ह्या जन्मी जणू आणि सावनी नातू ह्यांचे बुगडी माझी सांडली गं गाण्याने माहोल अजून रंगतदार झाला. पु.ल देशपांडे, सुधीर फडके, ग.दि.मा ह्यांच्याबरोबर विविध गुणदर्शन म्हणून देवेन पहिनकर ह्यांनी वऱ्हाड निघालंय लंडन चा एक भाग सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. त्यानंतर अनया जोशी, नादब्रम्ह्च्या तेजस्विनी घाणेकर आणि ग्रुप ने कत्थकचे सादरीकरण केले. कार्यक्रम छान रंगत होता, शेवटी स्वरांकूर ग्रुप ने सुधीर फडके, ग.दि.मा आणि पु.लं  ह्यांची गाणी गायली . शशांक बोपळकर, राजेश आवाके,  प्रणाली मराठे आणि नेहा आंबेकर ह्यांनी गाणी सादर केली तर सचिन जैन (तबला), संकेत देशपांडे (हार्मोनिअम) आणि भूषण सोनवणे (गिटार) ह्यांनी साथ दिली. देहाची तिजोरी, कौसल्येचा राम, कानडा राजा पंढरीचा, तुझ्या गळा माझ्या गळा, आदी गाणी सादर करून कार्यक्रमाची सांगता केली.  

यंदाच्या वर्षी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हे धनश्री मोघे ह्यांनी पार पाडले तर प्रसादाचा शिरा श्रुती पोतदार ह्यांच्या कडून होता. तसेच गणपतीची आरास निलेश शहाणे आणि सुप्रिया शहाणे ह्यांनी केली. तांत्रिक कारणांनी कार्यक्रमास विलंब होऊन देखील सर्व गणेशभक्तांनी संयम दाखवून सहकार्य केले त्याबद्दल तोक्यो मराठी मंडळ सर्व गणेशभक्तांचे मनःपूर्वक आभारी आहे.  

दिनांक : ०७ सप्टेंबर, २०१९

ठिकाण: टॉवर हॉल फुनाबोरी 

Show More

अनया जोशी

 कत्थक नृत्याचा अविष्कार 

स्वरांकूर

 ग.दि.मा, सुधीर फडके ह्यांची अप्रतिम गाणी.  

गुढीपाडवा २०१९

कार्यक्रमाविषयी

यंदाच्या वर्षी तोक्यो मराठी मंडळाने दरवर्षीच्या प्रथेला थोडी बगल देत वेगळा प्रयोग सादर करून पाहिला. दरवर्षी गुढीपाडव्याला सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करत विविध गुणदर्शन सादर केले जाते. यंदाच्या वर्षी मात्र थोडासा वेगळा प्रयत्न करत क्रिकेट विश्वातील प्रसिद्ध पत्रकार श्री. सुनंदन लेले ह्यांचा "बारा गावचे पाणी" हा केवळ क्रिकेट नाही तर विविध विषयांनी नटलेला आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केला. क्रिकेट वार्तांकनाच्या निमित्ताने सुनंदन लेले हे कायमच परदेश दौऱ्यावर जात असतात. विविध देशात येणारे वेगवेगळे अनुभव आणि क्रिकेटच्या पडद्यामागचे किस्से असे विविध विषयांनी भरलेला बारा गावचे पाणी हा कार्यक्रम लोकांना फार आवडला. कार्यक्रमानंतर प्रेक्षकांना देखील सुनंदन लेले ह्यांच्या बरोबर प्रश्नोत्तर करण्याची संधी मिळाली. कार्यक्रमाच्या शेवटी सुनंदन लेले ह्यांनी क्रिकेट संबंधी एक प्रश्नोत्तरांचा खेळ खेळून विजयी लोकांना खास आकर्षित अशी बक्षिसं देऊन कार्यक्रमाची सांगता केली.

कार्यक्रमाची माहिती

दिनांक: १३ एप्रिल, २०१९

ठिकाण: किता कासाई  कम्युनिटी  हॉल

क्षणचित्रे

मकरसंक्रांती २०१९ ची क्षणचित्रे

    Copyright © 2025 TOKYO MARATHI MANDAL - All Rights Reserved.

    Powered by

    • मुख्य पान
    • गुढीपाडवा : सोबतीचा करार
    • कार्यकारिणी समिती