२०२० प्रमाणे २०२१ मध्ये देखील कोरोनाचे निर्बंध चालूच राहिल्याने तोक्यो मराठी मंडळापुढे कार्यक्रम आयोजित करताना मोठा प्रश्नच उभा होता. पुन्हा एकदा ऑनलाईन माध्यमाचा आधार घेत आपले प्रसिद्ध कलाकार संकर्षण कऱ्हाडे आणि गायक अनिकेत सराफ ह्यांच्या कविता आणि गायन ह्यांच्या जुगलबंदीचा आस्वाद जपानमधील मराठी मंडळींना घेता आला. अनिकेत सराफ ह्यांनी अप्रतिम गीत सादर करून सुरमयी संध्याकाळची सुरवात केली, तर संकर्षण कऱ्हाडे ह्यांनी आपल्या कवितांचे सादरीकरण करून एक वेगळीच रंगत आणली. त्यानंतर अनिकेत सराफ ह्यांनी हे सुरांनो चंद्र व्हा, गझल, पाहिले न मी तुला, देव देव्हाऱ्यात नाही, इत्यादी गाणी गात रसिक प्रेक्षकांची मने जिंकली, तर संकर्षण कऱ्हाडे ह्यांनी देखील त्यांच्या गृहिणी, पंढरीच्या विठुराया, इत्यादी मनाला भिडणाऱ्या अप्रतिम कवितांचे सादरीकरण करून एक वेगळेच वातावरण केले.
अगदी कमी वेळात संकर्षण कऱ्हाडे आणि अनिकेत सराफ ह्यांनी कार्यक्रमाची तयारी करून जपानमधील स्थायिक मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन केल्या बद्दल तोक्यो मराठी मंडळ त्यांचे आभारी आहेत.
जपान मध्ये वाढत्या मराठी भाषिकांची संख्या पाहत आणि येथे देखील लोक आपल्या परंपरा आणि सणवार जपताना दिसतात. हीच बाब हेरून तोक्यो मराठी मंडळाने जपानमधल्या मंडळींना आपल्या घरचे गणेशोत्सवाचे क्षणचित्रे सादर करण्याचे आवाहन केले. खूप लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल तोक्यो मराठी मंडळ त्यांचे आभारी आहे.
१. प्रार्थना : सर्वेश्वरा शिवसुंदरा
२. कौशल्य सादरीकरण : १९७ देशांचे झेंडे ओळखणे
३. गायन : जेव्हा तुझ्या बटांना
४. गायन : स्वये श्रीराम प्रभू ऐकती
५. लेख सादरीकरण : सहज
६. गायन : कळीदार कपुरी पान
७. नृत्य : आली ठुमकत नार
८. शास्त्रीय गायन : राग पुरिया धनश्री
९. कविता : देव कुठे आहे
१०. पोवाडा : चला घालू स्वातंत्र्यसंगरी रिपुवरी घाला
११. एकांकिका : झूsss
१. नृत्य + चित्र : सावळे सुंदर + भारतरत्न पं. भीमसेन जोशी
२. लोकगीत : जेजुरीच्या खंडेराया जागराला या या
३. रागमाला
४. जादूचे प्रयोग
५. गायन : विजयी पताका श्रीरामाची
६. नृत्य : मिश्रसंगीत
७. गायन + वादन : सर सुखाची श्रावणी
८. पाककला : तोफू टिक्की
९. कौशल्य सादरीकरण : गणेशमूर्ती
१०. एकांकिका : लॉकडाऊन चा प्रवास