MR

Translate:

image19

गुढीपाडवा २०२०

कार्यक्रमाविषयी


अधिक माहिती लवकरच 

image20

नुकताच पार पडलेला कार्यक्रम

मकरसंक्रांत २०२०

तोक्यो मराठी मंडळाचा इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला कार्यक्रम मकरसंक्रांत मोठ्या उत्साहात पार पडला. नुकतेच भारतातून आल्यावर पुन्हा एकदा आपल्या घरच्या वातावरणाचा आनंद घेता यावा या साठी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. यंदाच्या वर्षी प्रथमच आलेले प्रेक्षक जास्त होते. तोक्यो मराठी मंडळाच्या कार्यकारिणी समितीने विविध मजेशीर खेळांचे आयोजन केले आणि सर्व रसिक प्रेक्षकांनी त्याला भरभरून दाद दिली आणि खेळांचा आनंद देखील लुटला. 


सुरवातीला प्रथमच आलेल्या पाहुण्यांची ओळख करून घेण्यात आली. नंतर हिमांगी कुलकर्णी ह्यांनी शब्दांचे खेळ, इमोजी वरून गाणे, सिनेमा ओळखणे, असे विविध खेळ आयोजित करून कार्यक्रमाची रंगतदार सुरवात केली. नंतर रोहित हळबे ह्यांनी नाती-गोती नामक एक कोड्यांचा आणि नंतर नात्यांवरील आधारित म्हणींचा खेळ आयोजित करून स्पर्धकांना भलतेच कोड्यात टाकले. त्यानंतर निरंजन गाडगीळांनी देखील छोट्याशा आवाज बंद व्हिडीओला संवाद देयचा असा गमतीशीर खेळ आयोजित केला होता. चेहऱ्याचे हवं भाव बघून त्याला आपल्या मनाचे आणि तितकेच तर्कशुद्ध संवाद देताना स्पर्धकांची भलतीच दमछाक झाली. आणि शेवटी मंजिरी टिळेकर ह्यांनी मराठी व्याकरणाच्या आधारावरच खेळ आयोजित करून स्पर्धकांना बऱ्याच वर्षांनंतर मराठीत लिहायला प्रेरित केले.  आणि शेवटी सरप्राईज म्हणून प्रतिज्ञाचा खेळ आयोजित केला होता. ज्याला शाळेतील पाठयपुस्तकातील प्रतिज्ञा पाठ आहे त्या संघाला भरघोस पॉईंट्स असा सरप्राईज खेळ होता पण कुठल्याच संघाला त्याचा फायदा करून घेता आला नाही. 


कार्यक्रमानंतर अल्पोपहार आयोजित केले होते. सर्व प्रेक्षकांनी गप्पांचा आस्वाद घेत अल्पोपहाराचा देखील आनंद घेतला आणि नंतर सर्वानी कार्यालयाची आवराआवरी आणि साफसफाई करण्यात देखील हातभार लावून मंडळाचे काम हलके केल्या बद्दल मंडळ सर्व प्रेक्षकांचे आभारी आहे,  


दिनांक : २५ जानेवारी २०२० 

ठिकाण: किता कासाई कम्युनिटी हॉल