Translate:
२८ जानेवारी २०२३ (शनिवार) रोजी मंडळाचा २०२३-सालचा पहिला कार्यक्रम – मकर संक्रांती स्नेहसंमेलन आयोजित करीत आहोत तेव्हा सर्वांनी जरूर सहभागी व्हावे. अनौपचारिक वातावरणात जुन्या-नव्या सभासदांना भेटण्याची संधी मिळावी, गाणी-कविता-हास्यविनोद इत्यादी वैयक्तिक विविध गुणदर्शन,प्रश्नमंजुषा तसेच गप्पा-गोष्टी, अल्पोपहार करीत काही वेळ एकत्रपणे मजेत जावा असे कार्यक्रमाचे स्वरूप असेल.अधिक माहिती खालील प्रमाणे.
दिवस/वेळ: २८ जानेवारी २०२३ (शनिवार), सायंकाळी ६ ते ९ (*हॉल प्रवेश ५:३० पासून चालू)
स्थळ: फुनाबोरी कम्युनिटी हॉल
प्रवेश मूल्य: ६०० येन (वय वर्ष ६+ पासून)
※ PAYMENT : https://tokyomarathimandal.com/paymentdetails
नाव नोंदणी फॉर्म: https://forms.gle/XjrfZzNycGXZHoQN7
- विशेष नोंद -
※हॉलच्या आसन क्षमतेनुसार प्रथम-नाव-नोंदणी,प्रथम-सेवा तत्त्वावर ८५ लोकांपर्यंत मर्यादित
※विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम प्रत्येकी साधारण ५ मिनिटे वैयक्तिक सादरीकरणा पुरता (about 5 minutes Solo Performance) मर्यादित असेल. कार्यक्रम सादर करायचा असल्यास आपले नाव, आणि कार्यक्रमाबद्दल थोडक्यात लिहून tokyomarathimanda@gmail.com येथे ई-मेल ने संपर्क करावा
Copyright © 2019 TOKYO MARATHI MANDAL - All Rights Reserved.
Powered by GoDaddy