MR

Translate:

तोक्यो मराठी मंडळ
तोक्यो मराठी मंडळ
  • मुख्य पान
  • gudhipadva-2023
  • मागील कार्यक्रम
  • कार्यकारिणी समिती
  • Register
  • More
    • मुख्य पान
    • gudhipadva-2023
    • मागील कार्यक्रम
    • कार्यकारिणी समिती
    • Register

MR

  • मुख्य पान
  • gudhipadva-2023
  • मागील कार्यक्रम
  • कार्यकारिणी समिती
  • Register

मकर संक्रांती स्नेहसंमेलन, २०२३

नमस्कार मंडळी,


कालच्या संक्रांत स्नेहसंमेलनात आपण आवर्जून सहभागी झालात त्याबद्दल खरंच खूप खूप आभार. आपलं मकर संक्रांतीचं स्नेह संमेलन हा एखादा औपचारिक कार्यक्रम नसून एक कौटुंबिक गेट टुगेदर असतं, ज्यात नव्या जुन्यांच्या ओळखी, कलागुणांचं सादरीकरण, खेळ, गप्पा असा असा परिपूर्ण कार्यक्रम असतो. ह्याची प्रचिती कालही आली जेव्हा महाराष्ट्राच्या जवळपास सर्वच भागांमधून आपण आलात, त्यामध्ये अगदी छोट्यांपासून ते तरुण विद्यार्थ्यांपर्यंत आणि नवीनच स्थायिक झालेल्यांपासून ते अनेक दशकं जपान मध्ये वास्तव्य असणाऱ्यांपर्यंत अशी अनेक मंडळी होती. त्यांचा खेळांमधला आणि एकत्र गप्पांमधला सहभाग लक्षणीय होता आणि आयोजक म्हणून आम्हाला अतिशय आनंद देणारा होता.  


कालच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आपल्या वक्त्या शलाका मनोहर ज्या शेकडो किलोमीटर्स सायकलिंगसाठी जातात, ज्यांनी आपल्या जपान आणि भारतातल्या अनुभवांबद्दल आणि त्यांच्या ह्या पॅशन बद्दल सांगितलं त्यांचे खूप खूप आभार. तसेच आपल्या दुसऱ्या वक्त्या स्वप्नाली पुराडकर ज्या 'इंडियन प्रोफेशनल्स इन जपान (IPJ)' ग्रुप च्या संस्थापक आहेत, ज्या गेली अनेक वर्ष जपान मध्ये कार्यरत असलेल्या भारतीयांना एकत्र आणत आहेत, अनेक प्रकारे साहाय्य करत आहेत त्यांनी त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास आपल्या बरोबर शेअर केला केला त्यांच्या आगामी कार्यक्रमांबद्दल माहिती दिली त्यांचेही खूप खूप आभार. ह्या दोन्ही वक्त्यांना त्यांच्या वयक्तिक वाटचाली साठी तोक्यो मराठी मंडळातर्फे भरभरून शुभेच्छा. 


मंडळ म्हणून आणि आयोजक म्हणून विशेष आभार मानावेसे वाटतात ते काल सहभागी झालेल्या अनेकांचे ज्यांनी जपान मधले नियम आणि वेळेची शिस्त लक्षात घेत कार्यक्रम संपताच संपूर्ण आवराआवर करण्यात अगदी शेवट पर्यंत सहकार्य केलं त्यांचे. तुम्हा सर्वांच्या मदती शिवाय हे सहज शक्य झालं नसतं! 


तोक्यो मराठी मंडळाच्या आगामी मराठी राजभाषा दिन आणि 'लख लख चंदेरी (गुढी पाडवा 2023) ह्या कार्यक्रमांची घोषणा काल केलीच, त्याबद्दल अधिक माहिती घेऊन लवकरच घेऊन येऊ. 


आपले,

तोक्यो मराठी मंडळ

गणेशोत्सव, २०२३

    मी वसंतराव

    घेऊन येत आहोत,आपण सर्वच आतुरतेने वाट बघत असलेला, एका अत्यंत वेगळ्या गायनशैलीचा अध्वर्यू असणाऱ्या, ज्यांच्या गायकीने रसिकांना कित्त्येक वर्ष अक्षरशः मंत्रमुग्ध केलं त्या पंडित वसंतराव देशपांडे यांचा जीवनप्रवास उलगडून दाखवणारा, त्याच ताकदीचा, त्याच तोलामोलाचा चित्रपट "मी वसंतराव", ज्याला भारतात आणि जगभरात रसिकांनी भरभरून दाद दिली!


    दिवस: 2 जून 2022 (गुरुवार)

    सायंकाळी 7:00 वाजता


    चित्रपटगृह: AEON Cinema Ichikawa, MYODEN


    तिकीट: 2,000 JPY (12 वर्षांखालील मुलांसाठी 1,500 JPY)

      https://tokyomarathimandal.com/paymentdetails


    अत्यंत मोजक्या प्रेक्षकसंख्येत प्रयोग करीत आहोत, त्यामुळे आपले तिकीट लवकरात लवकर आरक्षित करावे

    कृतज्ञ मी, कृतार्थ मी!!!   


    डिसेंबर २०२१ मध्ये कार्यकारिणी समिती मध्ये कार्यरत असलेले मल्हार आणि हिमांगी कुलकर्णी, कौस्तुभ देशपांडे, दीप्ती ठाकूर आणि मंजिरी टिळेकर ह्यांनी वैयक्तिक कारणास्तव समिती मधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आणि २०२२ पासून नवीन कार्यकारिणी समिती मध्ये नव्याने निनाद आणि मीनल बगवाडकर, धवल आणि पूजा दातार, देवेन पहिनकर आणि जुईली देसाई रुजू झाले, तर रोहित हळबे, मीरा आणि निरंजन गाडगीळ हे आता प्रमाणे सक्रिय आहेत. सलग दोन वर्षे कोरोनामुळे निर्बंध असल्याने ह्या वर्षी देखील मंडळाने ऑनलाईन कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला. संक्रांतीचा कार्यक्रम देखील कोरोनामुळे आणि नवीन कार्यकारिणी समितीच्या बांधणी मुळे रद्द करावा लागला.  यंदाच्या वर्षी नेहमीच्या प्रथेला थोडी बगल देत मंडळाने प्रथमच मराठी राज्यभाषा दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला. 



    २७ फेब्रुवारीला रविवार असल्याने हि संधी साधत मंडळाने कार्यक्रमाचे आयोजन सुरु केले. काहीच दिवसांपूर्वी यतीन ठाकूर ह्यांनी "कृतज्ञ मी, कृतार्थ मी" ह्या वीर सावरकरांवर आधारित नाटकाबद्दल मंडळाशी संपर्क साधला होता. वीर सावरकर ह्यांनी स्वातंत्र्य लढा मध्ये दिलेले योगदान सर्वश्रुत होतेच पण त्यांचे मराठी साहित्यात दिलेले योगदान पण फार मोलाचे आहे. दिनांक, दूरदर्शन सारखे नेहमीच्या वापरातले शब्द त्यांनी आपल्या मराठी भाषेत आणले आणि ह्याच गोष्टीचे औचित्य साधत हा कार्यक्रम आयोजित करायचे ठरले. तेव्हा योगायोगाने पुण्यात असलेल्या देवेन पहिनकर ह्यांनी त्वरित यतीन ठाकूर ह्यांच्याशी संपर्क साधत नाटकाचा आढावा घेतला आणि समितीने त्वरित ह्या कार्यक्रमावर शिक्कामोर्तब केला. दिनांक २७ तारखेला दुपारी ३.३० वाजता नाटकाचे ऑनलाईन प्रसारण केले गेले. नवीन कार्यकारिणी समितीची ओळख करून नाटकास सुरवात झाली. सुमारे दोन तास असलेल्या नाटकात वीर सावरकरांचे राजकीय आणि अराजकीय आयुष्याचे विविध पैलू अभिनेते आणि दिग्दर्शक यतीन ठाकूर ह्यांनी उत्तम पद्धतीने सादर केले. अभिनेत्री दीप्ती भागवत ह्यांनी माई सावरकर तर यतीन ठाकूर ह्यांनी वीर सावरकरांची भूमिका अगदी उत्तम वठवल्या. रविवार आणि त्यात फिरायला जाण्यास साजेसे सुंदर हवामान असून देखील आपल्या प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावत भरघोस प्रतिसाद दिला. नाटका नंतर लेखक आणि कलाकारांसोबत चर्चासत्र आयोजित केले गेले होते जेणेकरुन प्रेक्षक आणि कलाकार ह्यांना संवाद साधता यावा. देवेन पहिनकर ह्यांनी सुत्रसंचलन करत कलाकारांशी संवाद साधून नाटकाचा प्रवास उलगडला. प्रेक्षकांनी देखील मनमोकळेपणाने प्रश्न विचारून कलाकारांशी संवाद साधला. सुमारे साडेतीन तास चाललेल्या कार्यक्रमाचा प्रेक्षकांनी मनमुराद आनंद घेतला.   



    धवल, निनाद, पूजा, मीनल, जुईली ह्यांनी अखंड मेहनत घेऊन कार्यक्रमाच्या जाहिराती, रूपरेषा, ध्वनिमुद्रण, इत्यादी कामांचा भार सांभाळला तर रोहित ह्यांनी वेबसाईटचे काम सांभाळले. तर निरंजन आणि मीरा ह्यांनी सर्वच पातळीवर मार्गदर्शन केले. २०२२ ची सुरवात जोमाने झाली असून आम्ही पुढच्या कार्यक्रमाच्या नियोजनाला सुरवात देखील केली आहे. लवकरच आगामी कार्यक्रमाची घोषणा करण्यात येईल.

    गणेशोत्सव : २०२१

    कार्यक्रमाविषयी :

    २०२० प्रमाणे २०२१ मध्ये देखील कोरोनाचे निर्बंध चालूच राहिल्याने तोक्यो मराठी मंडळापुढे कार्यक्रम आयोजित करताना मोठा प्रश्नच उभा होता. पुन्हा एकदा ऑनलाईन माध्यमाचा आधार घेत आपले प्रसिद्ध कलाकार संकर्षण कऱ्हाडे आणि गायक अनिकेत सराफ ह्यांच्या कविता आणि गायन ह्यांच्या जुगलबंदीचा आस्वाद जपानमधील मराठी मंडळींना घेता आला. अनिकेत सराफ ह्यांनी अप्रतिम गीत सादर करून सुरमयी संध्याकाळची सुरवात केली, तर संकर्षण कऱ्हाडे ह्यांनी आपल्या कवितांचे सादरीकरण करून एक वेगळीच रंगत आणली. त्यानंतर अनिकेत सराफ ह्यांनी हे सुरांनो चंद्र व्हा, गझल, पाहिले न मी तुला, देव देव्हाऱ्यात नाही, इत्यादी गाणी गात रसिक प्रेक्षकांची मने जिंकली, तर संकर्षण कऱ्हाडे ह्यांनी देखील त्यांच्या गृहिणी, पंढरीच्या विठुराया, इत्यादी मनाला भिडणाऱ्या अप्रतिम कवितांचे सादरीकरण करून एक वेगळेच वातावरण केले. 

     

    अगदी कमी वेळात संकर्षण कऱ्हाडे आणि अनिकेत सराफ ह्यांनी कार्यक्रमाची तयारी करून जपानमधील स्थायिक मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन केल्या बद्दल तोक्यो मराठी मंडळ त्यांचे आभारी आहेत. 


    घरचा गणपती : २०२१

    जपान मध्ये वाढत्या मराठी भाषिकांची संख्या पाहत आणि येथे देखील लोक आपल्या परंपरा आणि सणवार जपताना दिसतात. हीच बाब हेरून तोक्यो मराठी मंडळाने जपानमधल्या मंडळींना आपल्या घरचे गणेशोत्सवाचे क्षणचित्रे सादर करण्याचे आवाहन केले. खूप लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल तोक्यो मराठी मंडळ त्यांचे आभारी आहे.

    गणेशोत्सव : २०२१ (क्षणचित्रे)

    गुढीपाडवा विविधगुणदर्शन कार्यक्रम - १७ एप्रिल २०२१

    गुढीपाडवा कार्यक्रम - भाग १

    १. प्रार्थना : सर्वेश्वरा शिवसुंदरा

    २. कौशल्य सादरीकरण : १९७ देशांचे झेंडे ओळखणे

    ३. गायन : जेव्हा तुझ्या बटांना

    ४. गायन : स्वये श्रीराम प्रभू ऐकती

    ५. लेख सादरीकरण : सहज

    ६. गायन : कळीदार कपुरी पान

    ७. नृत्य : आली ठुमकत नार

    ८. शास्त्रीय गायन : राग पुरिया धनश्री

    ९. कविता : देव कुठे आहे

    १०. पोवाडा : चला घालू स्वातंत्र्यसंगरी रिपुवरी घाला

    ११. एकांकिका : झूsss

    गुढीपाडवा कार्यक्रम - भाग २

    १. नृत्य + चित्र : सावळे सुंदर + भारतरत्न पं. भीमसेन जोशी

    २. लोकगीत : जेजुरीच्या खंडेराया जागराला या या

    ३. रागमाला 

    ४. जादूचे प्रयोग

    ५. गायन : विजयी पताका श्रीरामाची

    ६. नृत्य : मिश्रसंगीत

    ७. गायन + वादन : सर सुखाची श्रावणी

    ८. पाककला : तोफू टिक्की

    ९. कौशल्य सादरीकरण : गणेशमूर्ती

    १०. एकांकिका : लॉकडाऊन चा प्रवास

    गणेशोत्सव २०२०

    "मोगरा" लाईव्ह नेटक

     जगभर कोरोनाचे सावट असताना देखील तोक्यो मराठी मंडळाने सामाजिक भान राखत आणि नियमांचे पालन करत यंदाच्या वर्षी आपले २५वे वर्ष  साजरे केले. २५वे वर्ष मोठ्या दिमाखात साजरे करायची इच्छा असताना देखील केवळ जपान, भारत नव्हे तर साऱ्या जगभर कोरोनाचे सावट पसरले. त्यामुळे एकंदरीतच सार्वजनिक कार्यक्रमांवर अनेक निर्बंध लादले गेले. यंदाच्या वर्षी गुढीपाडवा साजरा करता न आल्याने आधीच मनाला रुखरुख लागली असताना गणेशोत्सव तरी साजरा करू शकू का ह्याबाबत शंका होती. विमानसेवा ठप्प झाल्याने भारतातून कलाकार पाहुणे बोलवणे कठीण होते आणि आले असते तरी सार्वजनिक कार्यक्रमांवर असलेल्या निर्बंधांमुळे  कार्यक्रमाला प्रेक्षक जास्त संख्येने उपस्थित राहू शकले नसते त्यामुळे एकंदरीतच मंडळापुढे कुठला कार्यक्रम आयोजित करावा हा प्रश्न उभा होता. आणि अशातच मंडळाला "मोगरा" नामक एका नवीन संकल्पनेमध्ये एक आशेचा किरण दिसला. सर्व नियमांचे पालन करून, आपल्या रसिक प्रेक्षकांसाठी आपण कार्यक्रम आयोजित करून आपले २५वे वर्ष थोडे वेगळे पण परिस्थितीला अनुसरून साजरे करता आले. 


    तेजस रानडे लिखित आणि हृषीकेश जोशी दिगदर्शित "मोगरा" नेटक म्हणजेच नेट वरचे नाटक समस्त जपानवासी मराठी प्रेक्षकांसाठी हजर झाले. भारतात सुद्धा लॉकडाऊन मुळे कलासृष्टी एकंदरीतच थंडावलेली असताना हृषीकेश जोशी ह्यांच्या संकल्पनेतून ऑनलाईन नाटक म्हणजेच नेटक संकल्पनेचा उदय झाला. घरबसल्या एकाच तिकिटात सहकुटुंब आस्वाद घेता येणारा "मोगरा" एक वेगळाच अनुभव ठरला.  स्पृहा जोशी, भार्गवी चिरमुले, मयुरा रानडे, गौरी देशपांडे आणि वंदना गुप्ते ह्यांची प्रमुख भूमिका असलेले नेटक प्रेक्षांच्या चांगलेच पसंतीस उतरले. नेहमी प्रत्यक्षात नाटक पाहणे आणि थेट पण टीव्ही वर नाटक पाहणे हे जरा पचनी पडेल का हि धाकधूक होती, पण उत्तम कथा, अभिनय आणि संवादाने नटलेले हे नेटक प्रेक्षकांना आवडले.  सारेकाही नेट वर अवलंबून असल्याने त्यात भारतात अवकाळी वीज दगा देत असताना देखील असा धाडसी प्रयत्न करणे हे खरेच कौतुकास्पद आहे. सुरवातीला थोडी तांत्रिक अडचण येऊन देखील नेटकच्या तांत्रिक लोकांनी त्वरित अडथळे दूर करत कार्यक्रम सुखरूप पार पाडला. कार्यक्रम संपल्यानंतर नेटकच्या परिवाराशी आणि त्यादिवशीच्या पाहुण्या सुमित्रा भावे ह्यांच्याशी संवाद साधता आल्याने कार्यक्रमाची सांगता देखील छान पार पडली.


    सुरवातीपासूनच नेटकचे व्यवस्थापन सांभाळणाऱ्या हृषीकेश जोशी आणि समीरा गुजर जोशी ह्यांच्या तत्पर प्रतिसादाने कार्यक्रम सहज पार पाडत, तोक्यो मराठी मंडळाने "न्यू नॉर्मल" पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला. यंदाच्या वर्षी प्रथमच मंडळाने गणेशोत्सव कार्यक्रम दोन दिवसांत विभागून साजरा केला. २२ ऑगस्ट रोजी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत फक्त गणेश पूजन आयोजित केले होते. दरवर्षी प्रमाणे आरती कुलकर्णी ह्यांनी प्रसादाची जबाबदारी उचलली. २९ ऑगस्टला नेटकचे आयोजन केले होते. जपानवासीय मराठी प्रेक्षकांनी घरी नाट्यगृहात नाटक बघावे तसे वातावरण (चहा, वडापाव, वगरे) निर्मिती करत नेटक चा आनंद घेतला. कोरोनाने जगभर हाहाकार माजवला असताना देखील त्यातून पर्याय शोधून कार्यक्रम पार पाडल्याने यंदाचा कार्यक्रम प्रेक्षकांच्या कायमच लक्षात राहणार ठरेल.


    [गणेश पूजन]

    दिनांक: २२ ऑगस्ट

    स्थळ: सेइशींचो कम्युनिटी हॉल


    [मोगरा]

    दिनांक: २९ ऑगस्ट

    स्थळ: स्वगृही (ऑनलाईन)

    गणेशोत्सव २०२० : क्षणचित्रे

    मकरसंक्रांत २०२०

    कार्यक्रमाविषयी

    तोक्यो मराठी मंडळाचा इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला कार्यक्रम मकरसंक्रांत मोठ्या उत्साहात पार पडला. नुकतेच भारतातून आल्यावर पुन्हा एकदा आपल्या घरच्या वातावरणाचा आनंद घेता यावा या साठी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. यंदाच्या वर्षी प्रथमच आलेले प्रेक्षक जास्त होते. तोक्यो मराठी मंडळाच्या कार्यकारिणी समितीने विविध मजेशीर खेळांचे आयोजन केले आणि सर्व रसिक प्रेक्षकांनी त्याला भरभरून दाद दिली आणि खेळांचा आनंद देखील लुटला. 


    सुरवातीला प्रथमच आलेल्या पाहुण्यांची ओळख करून घेण्यात आली. नंतर हिमांगी कुलकर्णी ह्यांनी शब्दांचे खेळ, इमोजी वरून गाणे, सिनेमा ओळखणे, असे विविध खेळ आयोजित करून कार्यक्रमाची रंगतदार सुरवात केली. नंतर रोहित हळबे ह्यांनी नाती-गोती नामक एक कोड्यांचा आणि नंतर नात्यांवरील आधारित म्हणींचा खेळ आयोजित करून स्पर्धकांना भलतेच कोड्यात टाकले. त्यानंतर निरंजन गाडगीळांनी देखील छोट्याशा आवाज बंद व्हिडीओला संवाद देयचा असा गमतीशीर खेळ आयोजित केला होता. चेहऱ्याचे हवं भाव बघून त्याला आपल्या मनाचे आणि तितकेच तर्कशुद्ध संवाद देताना स्पर्धकांची भलतीच दमछाक झाली. आणि शेवटी मंजिरी टिळेकर ह्यांनी मराठी व्याकरणाच्या आधारावरच खेळ आयोजित करून स्पर्धकांना बऱ्याच वर्षांनंतर मराठीत लिहायला प्रेरित केले.  आणि शेवटी सरप्राईज म्हणून प्रतिज्ञाचा खेळ आयोजित केला होता. ज्याला शाळेतील पाठयपुस्तकातील प्रतिज्ञा पाठ आहे त्या संघाला भरघोस पॉईंट्स असा सरप्राईज खेळ होता पण कुठल्याच संघाला त्याचा फायदा करून घेता आला नाही. 


    कार्यक्रमानंतर अल्पोपहार आयोजित केले होते. सर्व प्रेक्षकांनी गप्पांचा आस्वाद घेत अल्पोपहाराचा देखील आनंद घेतला आणि नंतर सर्वानी कार्यालयाची आवराआवरी आणि साफसफाई करण्यात देखील हातभार लावून मंडळाचे काम हलके केल्या बद्दल मंडळ सर्व प्रेक्षकांचे आभारी आहे,  


    दिनांक : २५ जानेवारी २०२० 

    ठिकाण: किता कासाई कम्युनिटी हॉल 




    Show More

    गणेशोत्सव २०१९

    कार्यक्रमाविषयी

     

    तोक्यो मराठी मंडळाचा यंदाचा २४ वा गणेशोत्सव मोठ्या दिमाखात पार पडला. यंदाच्या वर्षी महाराष्ट्राचे लाडके आणि अजरामर व्यक्तिमत्व म्हणजेच पु.लं. देशपांडे ह्यांच्या १०० व्या जयंती निमित्त महाराष्ट्र नाही तर पूर्ण जगभर साजरा होत असलेला "पुलोत्सव" तोक्यो मराठी मंडळाने देखील आयोजित केला. त्याच बरोबर  ग.दि. माडगूळकर आणि सुधीर फडके ह्यांच्या देखील १०० व्या जयंती निमित्त येथील कलाकारांनी ह्या दिग्गज व्यक्तींच्या कलाकृती सादर करून त्यांना मानवंदना वाहिली. 

    प्रथम, हिमांगी कुलकर्णी आणि मल्हार कुलकर्णी ह्यांनी गणेश पूजन केल्यानंतर तेजस्विनी घाणेकर ह्यांनी गणेशवंदना सादर करून कार्यक्रमाला सुरवात करत, नंतर भूषण सोनवणे (सतार), संकेत देशपांडे (हार्मोनिअम) आणि सचिन जैन (तबला) ह्यांनी निवडक पु.लं. ह्या कथाकथन मधील सुप्रसिद्ध धून वाजवून कार्यक्रमात अनोखी मजा आणली आणि पुलोत्सवाला सुरवात केली. त्यानंतर बालकलाकार (रजत कुलकर्णी, शिरीन देशपांडे, मार्वी धुमाळे, आर्यन कुलकर्णी, रोहन पोतदार, अर्जुन देवधर, सिद्धार्थ देशपांडे आणि रिया कुलकर्णी) ह्यांनी पु.ल. देशपांडे ह्यांचे सुप्रसिद्ध "वयं  मोठम खोट्म" चे नाट्यवाचन करून एकच हशा पिकवला. त्यानंतर सावनी नातू आणि लहान मुलींनी  शेपटी वाल्या प्राणी, चांदोबा चांदोबा भागलास का गाणी सादर करून छान माहोल निर्माण केला. त्यात जुईली देसाई ह्यांनी सुधीर फडके ह्यांचे आज कुणीतरी यावे हे गाणे सादर करून त्यात भर टाकली. त्याच पाठोपाठ मधुरा अध्यापक ह्यांचे एकाच ह्या जन्मी जणू आणि सावनी नातू ह्यांचे बुगडी माझी सांडली गं गाण्याने माहोल अजून रंगतदार झाला. पु.ल देशपांडे, सुधीर फडके, ग.दि.मा ह्यांच्याबरोबर विविध गुणदर्शन म्हणून देवेन पहिनकर ह्यांनी वऱ्हाड निघालंय लंडन चा एक भाग सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. त्यानंतर अनया जोशी, नादब्रम्ह्च्या तेजस्विनी घाणेकर आणि ग्रुप ने कत्थकचे सादरीकरण केले. कार्यक्रम छान रंगत होता, शेवटी स्वरांकूर ग्रुप ने सुधीर फडके, ग.दि.मा आणि पु.लं  ह्यांची गाणी गायली . शशांक बोपळकर, राजेश आवाके,  प्रणाली मराठे आणि नेहा आंबेकर ह्यांनी गाणी सादर केली तर सचिन जैन (तबला), संकेत देशपांडे (हार्मोनिअम) आणि भूषण सोनवणे (गिटार) ह्यांनी साथ दिली. देहाची तिजोरी, कौसल्येचा राम, कानडा राजा पंढरीचा, तुझ्या गळा माझ्या गळा, आदी गाणी सादर करून कार्यक्रमाची सांगता केली.  

    यंदाच्या वर्षी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हे धनश्री मोघे ह्यांनी पार पाडले तर प्रसादाचा शिरा श्रुती पोतदार ह्यांच्या कडून होता. तसेच गणपतीची आरास निलेश शहाणे आणि सुप्रिया शहाणे ह्यांनी केली. तांत्रिक कारणांनी कार्यक्रमास विलंब होऊन देखील सर्व गणेशभक्तांनी संयम दाखवून सहकार्य केले त्याबद्दल तोक्यो मराठी मंडळ सर्व गणेशभक्तांचे मनःपूर्वक आभारी आहे.  

    दिनांक : ०७ सप्टेंबर, २०१९

    ठिकाण: टॉवर हॉल फुनाबोरी 

    Show More

    स्वरांकूर

     ग.दि.मा, सुधीर फडके ह्यांची अप्रतिम गाणी.  

    अनया जोशी

     कत्थक नृत्याचा अविष्कार 

    गुढीपाडवा २०१९

    कार्यक्रमाविषयी

    यंदाच्या वर्षी तोक्यो मराठी मंडळाने दरवर्षीच्या प्रथेला थोडी बगल देत वेगळा प्रयोग सादर करून पाहिला. दरवर्षी गुढीपाडव्याला सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करत विविध गुणदर्शन सादर केले जाते. यंदाच्या वर्षी मात्र थोडासा वेगळा प्रयत्न करत क्रिकेट विश्वातील प्रसिद्ध पत्रकार श्री. सुनंदन लेले ह्यांचा "बारा गावचे पाणी" हा केवळ क्रिकेट नाही तर विविध विषयांनी नटलेला आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केला. क्रिकेट वार्तांकनाच्या निमित्ताने सुनंदन लेले हे कायमच परदेश दौऱ्यावर जात असतात. विविध देशात येणारे वेगवेगळे अनुभव आणि क्रिकेटच्या पडद्यामागचे किस्से असे विविध विषयांनी भरलेला बारा गावचे पाणी हा कार्यक्रम लोकांना फार आवडला. कार्यक्रमानंतर प्रेक्षकांना देखील सुनंदन लेले ह्यांच्या बरोबर प्रश्नोत्तर करण्याची संधी मिळाली. कार्यक्रमाच्या शेवटी सुनंदन लेले ह्यांनी क्रिकेट संबंधी एक प्रश्नोत्तरांचा खेळ खेळून विजयी लोकांना खास आकर्षित अशी बक्षिसं देऊन कार्यक्रमाची सांगता केली.

    कार्यक्रमाची माहिती

    दिनांक: १३ एप्रिल, २०१९

    ठिकाण: किता कासाई  कम्युनिटी  हॉल

    क्षणचित्रे

    आगामी कार्यक्रम : गणेशोत्सव २०२२

    [कार्यक्रमाचे स्थळ, दिनांक आणि वेळ]

    स्थळ: फुनाबोरी टॉवर हॉल
    दिनांक: ३ सप्टेंबर २०२२, शनिवार
    वेळ: सायंकाळी ५:३० ते ८:००
     

    [कार्यक्रमाचे तिकिटाचे दर]

    १२ वर्ष व पुढील : १५०० येन
    ६ ते १२ वर्षांखालील : १००० येन
    ० ते ५ वर्षांखालील : शुल्क नाही


    [तिकिटाचे पैसे भरायचे पर्याय]

    पर्याय १ :
    paypay 1: dhavaldatar
    paypay 2: ninad2509


    पर्याय २ :
    Bank : A/C Name: Tokyo Marathi Mandal
    Tokyo Mitsubishi UFJ Bank.
    Branch: Nerima-Hikarigaoka.
    Type: Ordinary (Futsu).
    A/C No: 3848569


    पर्याय ३:
    आपल्या नजीकच्या कार्यकारणी समितीच्या सभासदा कडे जमा करणे
    (फुनाबोरी : मीरा / मीनल,  निशी कासाई : देवेन / जुईली,  म्योदेन : धवल / रोहित)

      https://tokyomarathimandal.com/paymentdetails

    Copyright © 2019 TOKYO MARATHI MANDAL - All Rights Reserved.

    Powered by GoDaddy

    • मुख्य पान
    • gudhipadva-2023
    • मागील कार्यक्रम
    • कार्यकारिणी समिती