image1

गुढीपाडवा २०१९

कार्यक्रमाविषयी

यंदाच्या वर्षी तोक्यो मराठी मंडळाने दरवर्षीच्या प्रथेला थोडी बगल देत वेगळा प्रयोग सादर करून पाहिला. दरवर्षी गुढीपाडव्याला सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करत विविध गुणदर्शन सादर केले जाते. यंदाच्या वर्षी मात्र थोडासा वेगळा प्रयत्न करत क्रिकेट विश्वातील प्रसिद्ध पत्रकार श्री. सुनंदन लेले ह्यांचा "बारा गावचे पाणी" हा केवळ क्रिकेट नाही तर विविध विषयांनी नटलेला आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केला. क्रिकेट वार्तांकनाच्या निमित्ताने सुनंदन लेले हे कायमच परदेश दौऱ्यावर जात असतात. विविध देशात येणारे वेगवेगळे अनुभव आणि क्रिकेटच्या पडद्यामागचे किस्से असे विविध विषयांनी भरलेला बारा गावचे पाणी हा कार्यक्रम लोकांना फार आवडला. कार्यक्रमानंतर प्रेक्षकांना देखील सुनंदन लेले ह्यांच्या बरोबर प्रश्नोत्तर करण्याची संधी मिळाली. कार्यक्रमाच्या शेवटी सुनंदन लेले ह्यांनी क्रिकेट संबंधी एक प्रश्नोत्तरांचा खेळ खेळून विजयी लोकांना खास आकर्षित अशी बक्षिसं देऊन कार्यक्रमाची सांगता केली.

कार्यक्रमाची माहिती

दिनांक: १३ एप्रिल, २०१९

ठिकाण: किता कासाई  कम्युनिटी  हॉल