गुढीपाडवा कार्यक्रमाची संक्षिप्त चित्रफीत
नमस्कार मंडळी,
कालच्या संक्रांत स्नेहसंमेलनात आपण आवर्जून सहभागी झालात त्याबद्दल खरंच खूप खूप आभार. आपलं मकर संक्रांतीचं स्नेह संमेलन हा एखादा औपचारिक कार्यक्रम नसून एक कौटुंबिक गेट टुगेदर असतं, ज्यात नव्या जुन्यांच्या ओळखी, कलागुणांचं सादरीकरण, खेळ, गप्पा असा असा परिपूर्ण कार्यक्रम असतो. ह्याची प्रचिती कालही आली जेव्हा महाराष्ट्राच्या जवळपास सर्वच भागांमधून आपण आलात, त्यामध्ये अगदी छोट्यांपासून ते तरुण विद्यार्थ्यांपर्यंत आणि नवीनच स्थायिक झालेल्यांपासून ते अनेक दशकं जपान मध्ये वास्तव्य असणाऱ्यांपर्यंत अशी अनेक मंडळी होती. त्यांचा खेळांमधला आणि एकत्र गप्पांमधला सहभाग लक्षणीय होता आणि आयोजक म्हणून आम्हाला अतिशय आनंद देणारा होता.
कालच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आपल्या वक्त्या शलाका मनोहर ज्या शेकडो किलोमीटर्स सायकलिंगसाठी जातात, ज्यांनी आपल्या जपान आणि भारतातल्या अनुभवांबद्दल आणि त्यांच्या ह्या पॅशन बद्दल सांगितलं त्यांचे खूप खूप आभार. तसेच आपल्या दुसऱ्या वक्त्या स्वप्नाली पुराडकर ज्या 'इंडियन प्रोफेशनल्स इन जपान (IPJ)' ग्रुप च्या संस्थापक आहेत, ज्या गेली अनेक वर्ष जपान मध्ये कार्यरत असलेल्या भारतीयांना एकत्र आणत आहेत, अनेक प्रकारे साहाय्य करत आहेत त्यांनी त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास आपल्या बरोबर शेअर केला केला त्यांच्या आगामी कार्यक्रमांबद्दल माहिती दिली त्यांचेही खूप खूप आभार. ह्या दोन्ही वक्त्यांना त्यांच्या वयक्तिक वाटचाली साठी तोक्यो मराठी मंडळातर्फे भरभरून शुभेच्छा.
मंडळ म्हणून आणि आयोजक म्हणून विशेष आभार मानावेसे वाटतात ते काल सहभागी झालेल्या अनेकांचे ज्यांनी जपान मधले नियम आणि वेळेची शिस्त लक्षात घेत कार्यक्रम संपताच संपूर्ण आवराआवर करण्यात अगदी शेवट पर्यंत सहकार्य केलं त्यांचे. तुम्हा सर्वांच्या मदती शिवाय हे सहज शक्य झालं नसतं!
तोक्यो मराठी मंडळाच्या आगामी मराठी राजभाषा दिन आणि 'लख लख चंदेरी (गुढी पाडवा 2023) ह्या कार्यक्रमांची घोषणा काल केलीच, त्याबद्दल अधिक माहिती घेऊन लवकरच घेऊन येऊ.
आपले,
तोक्यो मराठी मंडळ
Copyright © 2019 TOKYO MARATHI MANDAL - All Rights Reserved.
Powered by GoDaddy