|| संक्रांत २०१८ ||
नवीन वर्ष सुरु झाले की तोक्यो मराठी मंडळाचा पहिला कार्यक्रम असतो "संक्रात स्नेहमेळाव्या"चा!
या निमित्ताने आपण लहान-मोठे सर्वजण एकमेकांना नववर्ष शुभेच्छा देण्यासाठी भेटतो.
यंदाही आपण भेटणार आहोत "संक्रात स्नेहमेळाव्या"च्या कार्यक्रमात विविध धमाल उपक्रम आणि खेळाच्या माध्यमातून.
पोरांपासून थोरांपर्यंत सर्वांना सहभागी होता येईल असे विविध करमणुकीचे कार्यक्रम तसेच खेळ खेळून आपण करणार आहोत नवीन वर्षाची मस्त सुरुवात!
दिवस : रविवार, १४ जानेवारी २०१८
वेळ: सायं. ६:०० ते रात्रौ ९:००
शुल्क: वयोगट ४ वर्षे आणि अधिक: ८०० येन
वरील शुल्कामध्ये अल्पोपहार,हळदीकुंकू वाण इत्यादी समाविष्ट आहे.
स्थळ: फुनाबोरी टाॅवर हॉल
पत्ता: तोएई शिन्ज्युकू लाईन, फुनाबोरी स्टेशन समोरच
नकाशासाठी येथे क्लिक करा
पार्किंग स्थळ::हॉलशी संलग्न मर्यादित प्रमाणात पार्किंगची व्यवस्था उपलब्ध आहे. उपस्थितांनी कृपया शक्यतो ट्रेनचा वापर करावा अशी नम्र-विनंती.
नाव नोंदणी: कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे.
नाव नोंदणी
कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी: आपल्याला सादर करायच्या कार्यक्रमाविषयीची माहिती मंडळाच्या tokyomarathimandal@gmail.com ह्या ईमेल वर पाठवावा
*गुढीपाडव्याला solo कार्यक्रम करता येत नाही म्हणून संक्रांतीला मिळेल solo कार्यक्रम करण्याची खास संधी!
कार्यक्रम:(सायंकाळी ६:००~९:००) ५:३० ते ५:४५: पूर्वतयारी, नावनोंदणी, प्रास्ताविक
५:४५ ते ६:४५: कविता, अनुलेख वाचन (एक पात्री = Solo)
६:४५ ते ७:३०: अल्पोपहार
७:3० ते ८:३०: मराठी मालिका शीर्षकगीत आणि चित्रपट संगीतावर आधारीत प्रश्नमंजूषा "वर्ष नवे धमाल नवी"
८:३०समारोप