तोक्यो मराठी मंडळाचा नवीन वर्षातला पहिला कार्यक्रम म्हणजेच "संक्रात स्नेहमेळावा" दिनांक २१ जानेवारी २०१७ रोजी संपन्न झाला.
आपल्या संक्रांत स्नेहमेळाव्याचे स्वरुप छोटेखानी असते.
यंदा बर्‍याच नवीन सभासदांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. निरंजन गाडगीळ यांच्या प्रास्ताविकानंतर या सभासदांनी स्वतःची अनौपचारिक ओळख करुन दिली.
यानंतर सर्व बच्चेकंपनी ज्याची वाट बघत होती तो विविध स्पर्धांचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाची जबाबदारी भाग्यश्री भिडे, रुजुता साठे आणि मुक्ता कुलकर्णी यांनी घेतली. मुलांनी स्पर्धांचा आणि मिळालेल्या बक्षिसांचा पुरेपूर आनंद घेतला.
इयत्ता पाचवी पासून पुढच्या मुलांसाठी "मराठी अनुलेखन स्पर्धा" आयोजित केली होती. मोठ्या सभासदांना देखील या स्पर्धेत येण्याचे आवाहन केल्यावर सभासदांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला. त्यासाठी सर्व लहान-मोठ्या सभासदांचे मनःपूर्वक आभार! अनुलेखन स्पर्धेतले लहान आणि मोठ्या गटातले अनुक्रमे विजेते आहेत अनुष्का देशपांडे आणि संजय कागने.
अल्पोपहारा नंतर सर्व मोठ्यांसाठी विविध खेळांचे आयोजन केले होते. मंदार नाईक आणि अमोल भिडे यांनी या कार्यक्रमाची जबादारी उत्तम पार पाडली.
अनौपचारिक ओळखी, पोटभर गप्पा, विविध खेळ, स्पर्धा आणि अल्पोपहार असा भरगच्च कार्यक्रम झाला.
कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी आणि संपल्यावर देखील अनेक सभासदांनी उत्स्फूर्तपणे हॉलची मांडणी आणि आवराआवर करण्यात मदत केली. त्यासाठी त्यांचे विशेष आभार!!