२४ जानेवारी २०१५ ला मंडळाचा मकर संक्रांतीचा कार्यक्रम उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात कार्यकारी समितीच्या वतीने हेमंत विसाळने सर्व उपस्थित सभासदांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन केली. २०१५ मध्ये आपण पुस्तक पेटी ग्रंथालय सारखे नवीन उपक्रम सुरु करीत असून, त्याला सर्वांचाच सक्रीय सहभाग लाभावा अशी विनंतीही त्याने केली.

** कार्यक्रमाचे फोटो
या नंतर वैविध्य पूर्ण पोशाख व त्याला पूरक असे स्वगत म्हणून दाखवायचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सोनाली कुलकर्णी यांनी केले. फुलपाखरू, शामची आई, झाशीची राणी, शिवाजी तसेच रजनीकांत, अशी अनेक रूपे मुलांनी सादर केली. मारवी धुमाळेने सादर केलेली शामची आई प्रेक्षकांची विशेष दाद मिळवून गेली. fancy dress फुलपाखरू झाशीची राणी मारवी धुमाळे आर्यन कुलकर्णी शिवाजी
** वरील फोटो वर क्लिक करून व्हिडीओ बघता येईल.
iPhone/iPad वापरकर्त्यांसाठी व्हिडीओ
vividh आदित्य फडके इशिता पिंपळे शार्दुल जाधव चिन्मय कुलकर्णी अथर्व कुलकर्णी
** वरील फोटो वर क्लिक करून व्हिडीओ बघता येईल.
iPhone/iPad वापरकर्त्यांसाठी व्हिडीओ
त्या नंतर मुलांनी विविधगुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला. व्हायोलीन वादन, गिटार वादन, पिआनो वादन व श्लोक पठण असे खऱ्याअर्थानी विविध कला प्रकार प्रक्षकांना अनुभवता आले. आदित्य फडकेने व्हायोलीनवर भूप रागाचे अलंकार व चीज वाजवून दाखवली. चिन्मय कुलकर्णीने आपल्या आवडीचे जपानी गीत पिआनो वर सादर केले.. तसेच शार्दुल जाधव व इशिता पिंपळे ह्या दोघांनी गिटार वर धून वाजवत गाणे सादर केले. अखेरीस अथर्व कुलकर्णीने भीमरूपी महारुद्रा हा श्लोक म्हणून दाखवला. सर्वच कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. मुलांचे कौतुक म्हणून मंडळाकडून त्यांना दैनंदिन संस्कार हे पुस्तक भेट देण्यात आले.

विविध गुणदर्शनाच्या कार्यक्र्मानंतर सर्वांनी अल्पोपहार घेतला. साबुदाण्याची खिचडी, चहा, वेफर्स असा बेत होता. मध्यंतरात उपस्थित महिलांना हळदीकुंकू व संक्रांतीचेवाण देण्यात आले. तसेच सर्वांना तिळगुळही वाटण्यात आला.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धाची सुरुवात पाककला स्पर्धेच्या बक्षीस समारंभाने झाली. ह्यावर्षीचे बक्षीस सौ.गौरी शेंबेकर ह्यांना उपासाचा व्रेप व खजूर मिल्कशेक ह्या पाककृतींसाठी सौ. त्सुनेको बापट ह्यांच्या शुभहस्ते बक्षीस देण्यात आले. बक्षीस समारंभा नंतर आपण रहात असलेला देश "जपान" ह्या विषयावर प्रश्नमंजुषा घेण्यात आली. ह्या प्रश्न मंजुषेचे आयोजन ज्ञानदीप व वरदा कुलकर्णी ह्या दांपत्याने केले होते. त्यांची कन्या ज्ञानदा हिने गुणनिर्देशक म्हणून तर कुनिको-सान ह्यांनी वेळनिर्देशक म्हणून मदत केली. सर्व प्रेक्षकांचे मिळून ४ गट पाडण्यात आले. त्यात एक गट हा खास लहान मुलांचा केला होता. ह्या ५ गटांनमध्ये चुरशीची स्पर्धा झाली. दृक-श्राव्य फेरी तसेच जपानी सिनेसृष्टी, क्रीडाजगत, कला, भूगोल इत्यादी विषयांवर प्रश्न योजलेले होते. सर्व गटांवर सरशी करून विजय मिळवला तो मुलांच्या गटाने. आपला हा विजय साजरा करताना मुलांचा आनंद गगनात मावत नव्हता. कार्यक्रमात सर्वच उपस्थितांनी उत्साहाने भाग घेतल्या मुळे कार्यक्रम अतिशय रंगला. कार्यक्रमाच्या शेवटी नरेन देसाई ने प्रेक्षकांचे मनःपुर्वक आभार मानले.