संक्रांत २०१३
दिनांक २६ जानेवारी २०१३ रोजी तोक्यो मराठी मंडळाचा संक्रांत २०१३ हा कार्यक्रम उत्साहाच्या वातावरणात पार पडला. मराठी सिनेमाची १०० वर्ष असे ह्या वर्षीच्या कार्यक्रमाचे सूत्र होते. याच सूत्राला अनुसरून दृकश्राव्य नृत्य गायन अश्या विवीध मध्मातून १०० वर्षांची जादू प्रेक्षकांनपुढे साकार केली गेली. कार्यक्रमाची प्रस्तावना करताना राहुल बापट याने दर वर्षी मंडळातर्फे देण्यात येणारी देणगी यंदा श्री प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा येथल्या लोकबिरादरी प्रकल्पाला देण्यात येणार असल्याच घोषित केला.
कार्यक्रमाची सुरुवात स्नेहल रुईकर हिच्या गणेश वंदनेने झाली. सिनेमायुगाच्या आधी महाराष्ट्रात विशेष बहर आलेल्या संगीत नाटकांच्या जमान्यातील काही संगीतपदांच्या सादरीकरणातून ह्या सुवर्ण काळाचा आढावा नाट्यरंग या कार्यक्रमात घेतला तो गायत्री कुलकर्णी हिच्या विद्यार्थ्यांनी. "वद जाऊ कुणाला शरण", "युवती मना","कठीण कठीण कठीण किती" अशी प्रसिद्ध पद ह्या मुलांनी तयारीने सादर केली. तबल्यावर आशुतोष देशपांडेनी तर संवादिनीवर गायत्री कुलकर्णी ने साथसंगत केली.
ह्या नंतर कार्यक्रमाचा मुख्य विषय असेलेला "मराठी सिने सृष्टीची १०० वर्षे" हा कार्यक्रम सादर करण्यात आला. राजा हरिश्चंद्र ते अलीकडच्या काळातल्या मोरया ह्या चित्रपटांचा दृकश्राव्य नृत्य गायन अश्या विवीध मध्मातून आढावा घेण्यात आला. रेशमाच्या रेघांनी वर लावणी नृत्य, जांभूळ पिकल्या झाडाखाली वरचे लोकनृत्य ते ही नवरी असली, बाईगो बाईगो वरचे हिप-हॉपनृत्य असे अनेक नृत्य प्रकार सादर केले गेले. तसेच रूपास भाळलो मी, धुंदी कळ्यांना, दोन घडींचा डाव, किसन्या ची माया लई न्यारी अशी गाणी ही सादर करण्यात आली. कार्यक्रमाचा शेवट "मोरया मोरया" गाण्यावरच्या नृत्याने करण्यात आली. नृत्य दिग्दर्शन शिल्पा रसाळ व अदिती पत्की यांचे होते. नेहेमी कार्यक्रमाच्या सुरुवातीला गणेश वंदना होत असली तरी, ही सिनेसृष्टीच्या पुढील १०० वर्षांची सुरुवात आहे, ह्या भावनेतून, शेवटी मोरया मोरयाने केली गेली असे सूत्रधारांनी सांगितले. कार्य्रकर्माचे सूत्रसंचलन मंजीरी टिळेकर व अदिती पत्की ह्यांनी केले.
कार्यक्रमाच्या व्हीडीओ बघण्यासाठी येथे क्लिक करावे
नेहेमी आयोजित केल्याजाणाऱ्या पाककला स्पर्धेचा विषय या वर्षी "लहान मुलांना शाळेत देण्यासाठीचा नाविन्यपूर्ण आणि पौष्टीक जेवणाचा डबा" असा ठेवण्यात आला होता.
अनेक गृहिणींनी स्पर्धेत उत्साहाने भाग घेतला होता. पहिले बक्षीस पटकावले ते सौ.गौरी शेमबेकर ह्यांनी तसेच सौ. सारिका देशपांडे यांनी पेश केलेल्या डब्याचा परीक्षकांनी विशेष नोंद घेतली.
कार्यक्रमाची सांगता मंडळाच्या तर्फे निरंजन गाडगीळ यांनी, कार्यक्रम सादर करणाऱ्या सर्व लहान मोठ्यांचे कौतुक व आभार मानून केली.