तोक्यो मराठी मंडळाचा संक्रांतीचा कार्यक्रम २८ जानेवारी २०१२ रोजी उत्साहाच्या वातावरणात साजरा झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्र संचालन मुग्धा यार्दी यांनी केले.

कार्यक्रमाचा पूर्वार्ध मंडळाच्या सभासदांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमांनी रंगला. गोंधळ या पारंपारिक भक्तीरसपूर्ण गाण्याने विविध गुणदर्शन या कार्यक्रमाची सुरवात झाली. छोट्या कलाकारांनी गायन, नृत्य सादर केले तसेच श्री. अमोल भिडे यांनी जादूचे प्रयोग सादर करून सर्वांची करमणूक केली. हिगाशी ओजीमा आणि ओजीमा यातील कलाकार मंडळीनी घन बरसत येती हा दृक्-श्राव्य कार्यक्रम सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात अनुरूप हि जोडप्या साठी स्पर्धा घेण्यात आली. ह्या स्पर्धे मध्ये ५ जोडप्यांनी सहभाग घेतला होता. शब्दकोडे फेरी, एक्शन फेरी , दृक् फेरी आणि झटपट फेरी अशा विविधफेऱ्या पार करून श्री. व सौ शिनकर हि एक अनुरूप जोडी निवडून आली.
श्री. व सौ शिनकर
नेहमीप्रमाणे यावर्षीही पाककला आणि सजावट स्पर्धा घेण्यात आली. पाककला स्पर्धे मध्ये नाविन्यपूर्ण पराठा व बर्फी ह्या वर्षी सादर करण्यात आल्या. ह्या स्पर्धेचे पराठ्यासाठी बक्षिस सौ. अनुपमा देसाई यांना तर बर्फी साठी सौ.गौरी पेंडसे यांना देण्यात आले. सजावट स्पर्धे मध्ये औक्षणाच्या थाळी ची कलापूर्ण सजावट अशी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धे मध्ये सौ. गौरी शेंबेकर आणि मही व इलिना पतकी यांना विभागून बक्षिस देण्यात आले.
कार्यक्रमाची सांगता बक्षिस वितरण समारंभानी झाली. कार्यकारी सामितीतर्फे या वर्षी विविध गुणदर्शन कार्यकमातील सहभागा बद्दल सर्व छोटया मित्रांना प्रशस्तीपत्रके देण्यात आली.
कार्यकारी समितीने मंडळा तर्फे रेडक्रोस भूकंपग्रस्त मदत निधीला एक लाख येन ची देणगी जाहिर केली.
कार्यक्रमाचे प्रायोजक: WaIndo INDIAN RESTAURANT