संक्रन्त २०१०
१७ जानेवरी २०१० रोजी तोक्यो मराठी मंडळाचा तिळ गूळाचा कर्याक्रम उत्साहाच्या वातवरणात साजरा झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. मालविका वैद्य ने केले तर सूत्र संचालन सौ. अश्विनी बापट यांने केले.कार्यक्रमाचा पूर्वार्ध मंडळाच्या सभासदांनी सादर केलेली गाणी, नाच त्याच प्रमाणे श्री. राहुल बापट यांनी सादर केलेल्या हिन्दी गाण्यांची जपानी आवृत्ती विषेश दाद मिळवून गेली.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रसंग नाट्य स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत दोन गटंनी भाग घेतला होता.आयत्यावेळी दिलेल्या विषयावर एका तसात दहा मिनिटांची नाटिका बसवायाची असे ह्या स्पर्धेचे स्वरूप होते. विषयाची विचारपूर्वक मांडणी, सर्व कलाकारांचा सहभाग, व्यासपीठाचा वापर आणि अकर्षक संवाद ह्या निकशावर परिक्षीकांनी स्पर्धेचा निकाल जाहीर केला. स्पर्धेचे पहिले बक्षिस सर्वश्री मकरंद दाते, सुजीत फडणीस, सारंग चिपलकट्टी , विश्वेश पोतदार, स्वनंद देव व सौ.भक्त्ती भोरकर यांनी सादर केलेल्या "करायला गेलो एक" ह्या नाटिकेला देण्यात आला. अभिनयाचा विशेश पुरस्कार श्री. मकरंद दाते यांना तर उत्तेजनार्थ पारितोषिक श्री. आशुतोष देशपांडे यांना देण्यात आला. सर्वश्री प्रशांत साठे, निरंजन गाडगीळ, अभिजीत पटवर्धन, राहुल कुलकर्णी व सौ. मुग्धा यार्दी यांनी स्पर्धेचे परिक्षण केले.     
नेहमीप्रमाणे यावर्षीही पाककला स्पर्धा घेण्यात आली. नाविन्यपूर्ण झुणका भाकर व विविध प्रकारच्या पुऱ्या ह्या वर्षी सादर करण्यात आल्या. ह्या स्पर्धेचे पहिले बक्षिस सौ. शिल्पा रेठरेकर यांना तर दुसरे बक्षिस सौ. मनली पाटणकर यांना देण्यात आले.
कार्यक्रमाची सांगता बक्षिस वितरण समारंभानी झाली. कार्यकारी सामितीतर्फे आभार प्रदर्शन करताना श्री. निरंजन गाडगीळ यांनी या वर्षी अजून बरेच कार्यक्रम करायाची इच्छा असून त्यासाठी सर्व सभासदांचे सहकार्य मागितले. कार्यक्रमाचे स्टेज व ध्वनी नियोजन श्री. राहुल कुलकर्णी यांनी केले.

कार्यकारी समितीने मंडळा तर्फे "खेळघर" या संस्थेला एक लाख येन ची देणगी जाहिर केली. खेळघर ही संस्था पुणे येथील कोथरुड या भागातील गरीब मुलाना शिक्षण देण्याचे काम गेली दहा वर्षे करीत आली आहे. कोथरुड येथील लक्ष्मीनगर झोपडपट्टी मधील अंशी मुले सध्या खेळघर तर्फे राबविल्या जाणाऱ्या या योजनेचा लाभ घेत आहेत. खेळघर बाबत अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

कार्यक्रमाची इतर काही छायाचित्रे: