तोक्यो मराठी मंडळ सहर्ष सादर करीत आहे अनुपम जोशी यांचा सरोदवादनाचा सुश्राव्य कार्यक्रम
तरूणपिढीतील अग्रसर सरोदिया अनुपम जोशी तोक्यो मराठी मंडळाच्या सभासदांसाठी खास सरोदवादनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत.
वय वर्ष ९ पासून तबला, शास्त्रीय गायन आणि नंतर सरोदवादन असा सांगीतिक प्रवास जोशी यांनी केला आहे. ते उस्ताद अलीअकबर खाँ, पंडित राजीव ताराणात, पं.तेजंद्र मुजुमदार, सोहन नीलकंठ, पंड. केन झुकेरमन यांचे शिष्य आहेत. कार्यक्रमात त्यांना तबल्यावर अनुप जशी तर तानपुऱ्यावर सायली कुळकर्णी साथसंगत करणार आहेत.
दिवस : १८ ऑगस्ट २०१३
वेळ : दुपारी ४:०० ते रात्री ८:००
शुल्क : ५०० येन (वयवर्षे ५ हून वरच्या सर्वांना लागू)
स्थळ : ओजीमा रोकुचोमे दांची हॉल क्रमांक ३/४,
पत्ता: ६-१-३ ओजीमा, कोतो-कू, तोक्यो १३६-००७२
नकाशासाठी येथे क्लिक करा
नाव नोंदणी : उपस्थितीसाठी नाव नोंदणी आवश्यक आहे.
ऑनलाईन नोंदणी
कार्यक्रमाची रूपरेषा :
  ४:३०-५:००: नावनोंदणी
  ५:००-५:१५: प्रास्ताविक
  ५:१५-६:००: सरोदवादन
  ६:००-६:३०: अल्पोपहार
  ६:३०-७:३०: सरोदवादन, कलाकारांशी संवाद
नोंद : १. वरील शुल्कामध्ये अल्पोपहार समाविष्ट आहे.
२. हॉलशी सल्लग्न अशी पार्किंगची व्यवस्था उपलब्ध नसल्याने उपस्थितांनी कृपया आपली वाहने नजीकच्या सार्वजनिक पार्किंग मध्ये लावावीत ही नम्र विनंती.