डॉ. अनिल अवचट यांची तोक्यो भेट
Quick Links   १.अनिल अवचट यांच्या ओरिगामी कलाकृतींचे प्रदर्शन २. डॉ. अनिल अवचट यांची मुलाखत व त्यांच्याशी गप्पा ३. मुलांसाठी ओरिगामी सत्र
मराठीतील ३० हून अधिक गाजलेल्या पुस्तकांचे लेखक आणि ‘मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रा’चे संस्थापक/चालक म्हणून आजवर आपल्याला माहीत असलेले डॉ. अनिल अवचट तोक्यो ला येत आहेत ! लेखक आणि सामाजिक कार्यकर्ता या दोन पैलूंबरोबरच, "कलावंत' म्हणून डॉ.अवचट यांची जवळून ओळख करून घेण्याची ही संधी आहे.

डॉ.अनिल अवचट यांच्याविषयी अधिक जाणून घ्यायचे असेल, तर येथे भेट द्या. डॉ.अनिल अवचट यांच्या तोक्यो भेटी दरम्यान विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. या सर्व कार्यक्रमांना, तोक्यो मराठी मंडळाचे सभासद मनापासून प्रतिसाद देतील अशी आमची खात्री आहे.

डॉ.अनिल अवचट यांच्या तोक्यो भेटी दरम्यान आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती खालील प्रमाणे:
१.अनिल अवचट यांच्या ओरिगामी कलाकृतींचे प्रदर्शन
निप्पोन ओरिगामी असोसिएशन च्या सहकार्याने आयोजित केलेल्या ओरिगामी कार्निवलमध्ये , डॉ. अनिल अवचट यांनी स्वतः तयार केलेल्या, लहान-थोर सर्व वयोगटातील रसिकांना आनंद घेता येईल अशा कलाकृती प्रदर्शित करण्यात येणार आहेत.
ओरिगामी ही मूळची जपानी कला. एकाच कागदाच्या घड्यांमधून, न कापता किंवा जोड न देता, त्रिमितीय वस्तू निर्माण करणं, हे या कलेतील आव्हान. या कलेत नवीन काही निर्माण करायचं असेल, तर भूमितीचा सखोल अभ्यास आणि अथक परिश्रम याला पर्याय नाही. आज जपान मध्ये सुद्धा, या कलेत नवनिर्माण करणारे कलावंत अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच आहेत. या पार्श्वभूमीवर, डॉ. अवचट यांनी अनेक वर्षे परिश्रम आणि अभ्यास करून, या कलेत खास स्वतः च्या अशा कलाकृती निर्माण केल्या आहेत, ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. गणपती, काश्मिरी शिकारा अशा खास भारतीय संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या वस्तू डॉ.अवचट यांनी निर्माण केल्या असून, कागदाप्रमाणेच पत्र्यातूनही त्यांनी या कलाकृती निर्माण केल्या आहेत. एका भारतीय व्यक्तीने जपानी पारंपारिक कलेत केलेल्या या नव-निर्माणाची जपानी लोकांना आणि जपान मधील मराठी लोकांना ओळख करून देण्यासाठी, तोक्यो मराठी मंडळाने हे प्रदर्शन आयोजित केलं आहे. त्याला दाद देण्यासाठी, या प्रदर्शनाला जरूर भेट द्या !

ओरिगामी या कलेविषयी आणि या प्रदर्शनाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी येथे भेट द्या.

दिवस : नोव्हेंबर ३ ते २५ (शनि.-रवि १० ते १७:३०, इतर दिवशी १२:३० ते १७:३०)
स्थळ:: कोदोमो नो शिरो, ओमोतेसांदो स्टेशन B2 एक्झिट पासून चालत ८ मिनिटे [दूरध्वनी:०३-३७९७-५६६६] नकाशा
प्रवेश शुल्क: प्रौढ(वय वर्ष १८+) ५०० येन , मुले (वय वर्ष ३ ते १७ खाली) ४०० येन

२. डॉ. अनिल अवचट यांची मुलाखत व त्यांच्याशी गप्पा
डॉ. अनिल अवचट यांनी तयार केलेली लाकडातील शिल्पे, त्यांची चित्रकला, बासरीवादन, व्यसनमुक्ती व इतर सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेले काम अशा अनेक पैलूंची रंजक ओळख करून देणारा, मुलाखत व गप्पांचा हा कार्यक्रम, साहित्य-कलेत रस घेणाऱ्या कुणाही रसिक मराठी माणसाने निश्चित चुकवू नये असा! !!!
दिवस : रवीवार, ११ नोव्हेंबर २०१२
वेळ: सकाळी १०:०० ते दुपारी २:००
शुल्क: प्रौढ (१२ वर्षा वरील): २,००० येन
६ ते १२ वर्षा मधील मुले: १,००० येन
स्थळ: चुओ सांग्यो काईकान,
पत्ता:२-२२-४ हिगाशी निहोनबशी, चुओकू तोक्यो १०३-०००४ (दूरध्वनी:०३-३८६४-४६६६)
नकाशा साठी येथे क्लिक करा
हॉल वेबसाईट(जपानी) साठी येथे क्लिक करा

तोएई शिंजुकू लाईन - बाकुरोयोकोयामा स्टेशन B4 एक्झिट पासून चालत ५ मिनिटांवर फोटो
तोएई असकुसा लाईन - हिगाशी निहोन्बाशी स्टेशन B3 एक्झिट पासून चालत ५ मिनिटांवर फोटो
JR-सोबू लाईन बकुरोचो स्टेशन C1 एक्झिट पासून चालत ५ मिनिटांवर फोटो
पार्किंग स्थळ:: हॉल मध्ये पार्किंगची व्यवस्था उपलब्ध नसल्याने उपस्थितांनी कृपया आपली वाहने नजीकच्या सार्वजनिक पार्किंग मध्ये लावावीत ही नम्र विनंती.
नाव नोंदणी: उपस्थितीसाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. ऑनलाईन नोंदणी
नोंद: १. वरील शुल्कामध्ये अल्पोपहार समाविष्ट आहे.
२. वरील शुल्कामध्ये भोजन समाविष्ट नाही. परंतु कार्यक्रमाच्या ठिकाणी भारतीय भोजन विकत घेण्याची सोय उपलब्ध आहे.
३. मुलांसाठी ओरिगामी सत्र
तोक्यो मध्ये राहणाऱ्या केवळ मराठीच नव्हे, तर इतरही भारतीय मुलांनाही हा कार्यक्रम खुला आहे. वय वर्षे ५ ते ९, आणि वय वर्षे १० ते १३ अशा दोन वयोगटांसाठी, प्रत्येकी एक तास वेगवेगळी कार्यशाळा घेण्यात येईल. पेंग्वीन, बेडूक, पक्षी, अंगठी अशा, मुलांना करताना मजा वाटेल अशा वस्तू मुलांना शिकवण्यात येतील.

अधिक माहितीसाठी, येथे भेट द्या.

अधिक माहिती साठी येथे संपर्क साधावा (tokyomarathimandal@gmail.com)
प्रायोजक: