कार्यक्रम यशस्वीपणे पारपडण्यासाठी अनेक लोकांचा सक्रीय हातभार लागला. सर्वांचे तोक्यो मराठी मंडळातर्फे विशेष आभार:
कलाकारांच्या वास्तव्यासंदर्भातील विशेष सहकार्य सौ. अवंती व श्री. संकेत देशपांडे
तिकीट विक्री समन्वयक: मुग्धा यार्दी, सौ.हिमांगी कुलकर्णी, सौ.प्रतिभा सुतार, सौ.नेत्रा मरकळे, सौ.रुपश्री साठे, सौ. मीरा गाडगीळ
छायाचित्र: श्री. मनोज पाटणकर, कु. शाल्मली गाडगीळ
व्हिडिओ प्रोजेक्टर: श्री.आशुतोष देशपांडे
रंगमंच सहाय्यक: श्री.जयेश जोगळेकर

२१ नोव्हेंबर २०१५ रोजी डॉ. सलील कुलकर्णी यांनी ‘माझे जगणे होते गाणे’ हा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या अनेक लोकप्रिय रचना तसेच आजवरच्या कलाप्रवासातले त्यांचे अनुभव सादर केले. विशेषतः पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या बरोबरचे जिव्हाळ्याचे संबंध, संगीतकार म्हणून मिळणारी दाद तसेच लता मंगेशकर यांच्या बरोबर केलेल्या 'क्षण अमृताचे' या त्यांनी संगीत दिलेल्या भावगीत संग्रहाच्या निमित्ताने काम करताना आलेले अनुभव त्यांनी सांगितले. डॉ.कुलकर्णी यांनी गायलेल्या सर्वच गाण्यांना रसिक प्रेक्षकांनी भरभरून दिली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात त्यांनी त्यांच्या लहानमुलांसाठीच्या रचना गायल्या त्यावेळी त्यांनी उपस्थित सर्वच मुलांना स्टेजवर येऊन आपल्याबरोबर गावे नाचावे असे आवाहन केले. बालगोपाळांनी मग स्टेजचा ताबा घेऊन आपल्या आवडत्या 'सुपरमॅन सुपरमॅन' 'अगोबाई ढगोबाई' इत्यादी गाण्यांवर नाचकरून भरपूर मजा केली. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी 'डिपाडी डिपांग' हे त्यांचे लोकप्रियगीत सर्व प्रेक्षकांना बरोबर घेऊन सादर केले. कार्यक्रमात त्यांना दीर्घकाळ साथ करणाऱ्या श्री.आदित्य आठल्ये ह्यांनी तबल्यावर समर्पक अशी साथ केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मुग्धा यार्दी यांनी केले तर आभार प्रदर्शन निरंजन गाडगीळ ह्यांनी केले. तोक्यो मराठी मंडळाच्या वतीने Guardian Developers ह्यांच्या सहकार्याबद्दल मनःपुर्वक आभार व्यक्त केले. तेसेच मंडळाच्या आमंत्रण स्वीकारून केवळ एका कार्यक्रमासाठी डॉ. कुलकर्णी तसेच श्री.आठल्ये तोक्यो ला आल्याबद्दल त्यांचे ही मनःपूर्वक आभार व्यक्तकेले तसेच कुमारी नीशा भिडे व कुमार आदित्य फडके यांच्या हस्ते मंडळातर्फे भेटवस्तू देण्यात आल्या.