तोक्यो मराठी मंडळाचा वैविध्यपूर्ण कार्यक्रम म्हणजेच गुढीपाडवा!
यंदाचा आपला गुढीपाडवा घेऊन येत आहे खास आकर्षण "मुक्तछंद!"
सालाबादप्रमाणे आपले सर्व बालक-पालक कलाकार आपल्याला भेट देणार आहेत नृत्य-नाट्य-गायनाच्या माध्यमातून!
दिवस : शनिवार १४ एप्रिल २०१८
वेळ: दुपारी २.३० ते संध्याकाळी ७.३०
शुल्क: वय वर्ष ४ ते ८ - १,२०० येन
वय वर्ष ९ आणि अधिक - २,००० येन
*वय वर्ष ० ते ३ च्या बालकांची नावनोंदणी आवश्यक आहे पण त्यांच्यासाठी वेगळे शुल्क आकारले जाणार नाही.
*जपानला अल्प काळासाठी भेटीस आलेल्या कुटुंबियांना विशेष सवलतीचा दर: १,८०० येन. सवलतीसाठी कृपया समन्वयकांशी संपर्क साधावा.
*(वरील शुल्कामधे उपाहार समाविष्ट आहे)
स्थळ: कोमात्सुगावा साकुरा हॉल (हिगाशि ओजिमा)
पत्ता: १३२-००३४ एदोगावा-कु, कोमात्सुगावा ३-६-३, जवळचे स्टेशन - हिगाशि ओजिमा- तोएइ शिनजुकु लाईन
नकाशासाठी येथे क्लिक करावे
पार्किंग: हॉलशी संलग्न पार्किंग उपलब्ध नसल्या मुळे कृपया कोमात्सुगावा पार्कच्या सार्वजनिक(सशुल्क) पार्किंगचा वापर करावा.
नाव नोंदणी: उपस्थितीसाठी नाव नोंदणी आवश्यक आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा:
२:००-: हॉल मधे प्रवेश देण्यास सुरुवात
३:०० ते ६:००: विविधगुणदर्शन मुख्य कार्यक्रम
६:०० ते ७:००: उपाहार
विशेष नोंद: अ) कार्यक्रमाची आगाऊ तिकिटविक्री सुरु झाली आहे. आपण नावनोंदणी करुन मंडळाच्या बँकखात्यात तिकिटाची रक्कम जमा करु शकता. अथवा तिकिटांची रक्कम समन्वयकांकडे सुपूर्त करु शकता. बँकेच्या खात्यात अथवा समन्वयकांकडे रक्कम जमा झाल्यावर आपल्याला इमेल द्वारे तिकीट पाठवले जाईल
तिकिटांसाठी खालील सभासदांना संपर्क करावा, अथवा तिकिटांसाठी मंडळाला ईमेल पाठवावी
  • फुनाबोरी - मीरा गाडगीळ, मंजिरी टिळेकर
  • ओजिमा - विविधा भोपरे
  • निशिकासाई - वरदा कुलकर्णी, हिमांगी कुलकर्णी
  • म्योदेन - रोहीत हळबे

    ब) वय वर्ष ४ खालील बालकांना भोजन हवे असल्यास बालक तिकिट घेणे अनिवार्य आहे.
    क) नावनोंदणी न करता तसेच आधी तिकीट न घेता ऐनवेळी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यास उपाहार मिळण्याची खात्री देता येणार नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी.