कार्यक्रमाचे प्रायोजक

फोटो

व्हिडिओ
तोक्यो मराठी मंडळाचा "गुढीपाडवा २०१५" कार्यक्रम शनिवार ११ एप्रिल २०१५ रोजी कासाई कुमिनकान येथे संपन्न झाला. मोठ्या प्रमाणावर गुढीपाडवा कार्यक्रम साजरा करण्याचे मंडळाचे हे पहिलेच वर्ष होते. पहिलेच वर्ष असून कार्यक्रमाला सभासदांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

स्नेहभोजनाने गुढीपाडवा मेळाव्याला सुरुवात झाली. भोजनाची आणि अल्पोपहाराची व्यवस्था "स्वागत" तर्फे केली गेली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निरंजन गाडगीळ यांनी केले.
आपल्या आवडीची संकल्पना घेऊन त्यावर आधारित कार्यक्रम सादर करण्याचे यंदाचे सूत्र होते. त्यानुसार विविध गटांनी आपल्या आवडीच्या संकल्पनेवर नृत्य-नाट्य-गायन सादर केले.
श्रीकृष्ण, राधा आणि गोपगोपिकांच्या साथीने सादर झाला "रंगी रंगला श्रीरंग".
तर त्यानंतर "मैत्री" गटाने आपल्या आयुष्यातले मैत्रीचे महत्व नृत्य-नाट्यातून साकार केले.
शिल्पा रसाळच्या नृत्य दिग्दर्शनाखाली मुलांनी डान्स मस्तीची धमाल केली तर "राकुतेन" च्या रुचा दामलेने राकुतेनकरांच्या टिमला नाचवले.

"कुसुमाग्रज प्रतिष्ठान" च्या समवेत तोक्यो मराठी मंडळाने येत्या एप्रिल महिन्यापासून एक अभिनव उपक्रम सुरु केला आहे, तो म्हणजे "माझे ग्रंथालय".
तोक्यो मधे रहाणार्‍या वाचकांसाठी आता मराठी पुस्तके ग्रंथालय स्वरुपात उपलब्ध असतील. उपक्रमाची माहिती निरंजन गाडगीळ, अनुपमा देसाई आणि मुग्धा यार्दी यांनी उपस्थितांना दिली.
या प्रकल्पाची अधिक माहिती आपल्याला वेबसाईटवर "माझे ग्रंथालय" वर क्लिक केल्यावर मिळू शकेल.
पूर्वार्धाच्या शेवटी भव्य नेपथ्य आणि देखावे असलेला "राजा शिवछत्रपती" हा कार्यक्रम सादर झाला. शिवजन्मापासून शिवराज्याभिषेकापर्यंतचा महाराजांचा प्रवास ह्या कार्यक्रमात उलगडून दाखवला.
मध्यंतरात चहा आणि बटाटेवड्यांचा आस्वाद घेतल्यानंतर प्रेक्षक पुढील कार्यक्रम बघण्यासाठी सज्ज झाले.
पु.ल. देशपांडे लिखित, अदिती पतकी आणि मंजिरी टिळेकर दिग्दर्शित "विठ्ठल तो आला आला" ही एकांकिका "AMI Drama Club" च्या मुलांनी सादर केली.
त्यानंतर "राकुतेनकरां"नी "तरुण तुर्क म्हातारे अर्क" ह्या नाटकातला प्रवेश सादर केला.

मंडळाने यावर्षी पहिल्यांदाच "लकी ड्रॉ" मधे पहिल्या पाच विजेत्यांना भेटवस्तू दिल्या.

कार्यक्रम संपताना आभार प्रदर्शन नरेन देसाई यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजिरी टिळेकर यांनी केले.

या कार्यक्रमाला "CMS IT Services Pvt. Lmt." यांचे प्रायोजक म्हणून योगदान लाभले.

या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आणि कार्यक्रम यशस्वी होण्यास हातभार लावलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
कार्यक्रमाविषयी आपण देखील आपला अभिप्राय मंडळाला अवश्य कळवा.