तोक्यो मराठी मंडळाने शनिवार १० सप्टेंबर २०१६ रोजी एकविसावा गणेशोत्सव दणक्यात साजरा केला.
लेझिमच्या पथकाने केलेले गणरायाचे स्वागत, मोठ्यांच्या बरोबरीनेच बालचमूचा अथर्वशीर्ष आणि आरती म्हणण्यात सहभाग तसेच बाप्पाचा नैवेद्य म्हणून २५ सभासद भगिनींनी सर्वांसाठी करुन आणलेले उकडीचे मोदक ही यंदाच्या गणेशोत्सवाची वैशिष्ठ्ये होती.

तोक्यो मराठी मंडळाच्या २१व्या वर्षीचा गणेशोत्सव म्हणजे नेहेमीपेक्षाही दिमाखात साजरा होणारच ही सर्वांची अपेक्षा पूर्ण केली ती राहुल देशपांडे, चैतन्य कुंटे आणि निखील फाटक ह्या त्रयीच्या अप्रतिम अश्या कार्यक्रमामुळे.
राहुलजींनी पुरियाधनश्री रागातील ख्यालाने चालू केलेला कार्यक्रम पंडीत कुमार गंधर्व ह्यांच्या निर्गुण भजनाने संपविला.
राहुलजींच्या बावनकशी सोन्यासारख्या झळकणार्‍या सुरांना साथ लाभली चैतन्यजींच्या संवादिनीची, तसेच निखिलजींच्या तबल्याची.
शब्द, सूर आणि लयीच्या त्रिवेणी संगमात प्रेक्षक भिजून चिंब झाले!

 
http://wowslider.com/ by WOWSlider.com v8.7.1m