!! गणपतीबाप्पा मोरया!!

तोक्यो मराठी मंडळाचा २० वा गणेशोत्सव रविवार दिनांक २७ सप्टेंबर २०१५ रोजी कासाई कुमिनकान येथे संपन्न झाला.
श्री गणेश पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यंदा श्री. अरुण कुलकर्णी आणि सौ. आरती कुलकर्णी यांच्या हस्ते श्री गणेशाची पूजा झाली. अथर्वशीर्ष पठण आणि आरतीने पूजेची सांगता झाली.
यानंतर सर्वांनी सहभोजनाचा लाभ घेतला.

यंदाच्या गणेशोत्सवाचे आकर्षण होते श्री. शरद पोंक्षे प्रस्तुत "नथुराम ते देवराम - लाख मोलाच्या गप्पा" हा कार्यक्रम.
भोजनानंतर लगेच कार्यक्रमाला सुरुवात झाली. श्री. पोंक्षे यांनी आत्तापर्यंत साकारलेल्या नाट्य-चित्रपट आणि मालिकांमधील भूमिका, नाटकाच्या दौर्‍यात त्यांना आलेले विविध अनुभव, नाटका मधील संवाद तसेच काही कविता यामधे सलग अडीच तास त्यांनी त्यांच्या गप्पांमधे प्रेक्षकांना गुंतवून ठेवले.
नंतर प्रेक्षकांनीही श्री. शरद पोंक्षे यांना काही प्रश्न विचारले ज्याची त्यांनी अतिशय मनमोकळी उत्तरे दिली.वेळेच्या मर्यादेमुळे कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला याची सर्वांनाच रुखरुख लागली.
अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली. अल्पोपहारा दरम्यान मंडळाच्या सभासदांना श्री. पोंक्षे यांच्याशी गप्पा मारण्याची संधी मिळाली.

कार्यक्रमाची क्षणचित्रे आपण खालच्या लिंकवर पाहू शकता.

या कार्यक्रमाचे प्रायोजक्त्व स्विकारल्याबद्दल "स्वागत रेस्टॉरंट" चे श्री. सुनील कुलकर्णी यांचे मनःपूर्वक आभार!

प्रायोजक:
Swagat Indian Restaurant