तोक्यो मराठी मंडळाचा १३ वा गणेशोत्सव ह्या वर्षी २९ ऑगस्टला साजरा करण्यात आला. श्री. श्रीधर फडके यांनी आपला "फिटे अंधाराचे जाळे" हा कार्यक्रम सादर केला. आपल्या भावपूर्ण गायकीने त्यांनी प्रेक्षकांना मंत्र मुग्ध करून टाकले. कधी सुधीर फडके यांच्या अवीट गोडी असणाऱ्या रचना, तर कधी स्वतःच्या गाजलेल्या रचना सदर करीत, श्रीधार्जीनी प्रेक्षकांना मनसोक्त आनंद दिला. प्रेक्षकांनीही प्रत्येक गाण्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन त्याची मनोमन पावती दिली.


कार्यक्रमाचे सूत्र संचलन मुग्धा यार्दीने तर निवेदन निरंजन गाडगीळने केले. तबल्याची साथ आशुतोष देशपांडे आणि संकेत देशपांडे यांनी केली. तसेच गाण्यात कोरस मध्ये निरंजन गाडगीळ, सुनीती पारसनीस ,गायत्री कुलकर्णी आणि मुग्धा यार्दी यांनी साथ केली. ताल वद्याची साथ राहुल पारसनीस याने केली.

कार्यक्रमाच्या नावनोंदणीचे काम प्रशांत साठ्ये आणि मालविका वैद्य यांनी केले. लहान मुलांसाठीच्या कार्यक्रमाचे संयोजन गौतम कुलकर्णी व अभिजित वैद्य यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यामागे कार्यकारी समिती बरोबरच, अनेक सदस्यांचाही सक्रीय सहभाग होता. गणपतीबाप्पान साठीची सुंदर आरास प्राजक्ता कुलकर्णी यांनी तयार केली होती. सर्व उपस्थितान साठी सुमधूर शिऱ्याचा प्रसाद सौ. रूपा साठे यांनी करून आणला होता. गणपती पूजनाची सर्व जबाबदारी प्रिया आणि राहुल कुलकर्णी यांनी सांभाळली होती. कार्यक्रमासाठी वेगवेगळी साधन सामग्री उपलब्ध करण्याचे काम राहुल बापट व हेमंत विसाळ यांनी सांभाळले. याही व्यतिरिक्त अनेकांचा हातभार कार्यक्रमास लागला - त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
कार्यक्रमाचे प्रायोजक
Ambika Trading Company Wa Indo Restaurant